Add Recipe

केळं टुटी फ्रुटी केक

  • तयारीची वेळ
    20 Mins
  • शिजण्याची वेळ
    55 Mins
  • किती लोकांसाठी
    4 People
  • बघितले
    932

साहित्य-
१) जास्त पिकलेली केळी – ३
२) १ १/२ वाटी रवा
३) १ वाटी साखर
४) १/२ – १ कप दुध
५) १/२ वाटी तूप
६) बेकिंग सोडा किंवा फ्रूट साॅल्ट
७) वेलची पुड (आवडीप्रमाणे)
८) टुटी फ्रुटी

कृती

1 Step

केळी व थोडं दूध मिक्सरला फिरवून घेणे. त्यात १ वाटी खाखर घालून पुन्हा फिरवून घेणे. तयार मिश्रणात मावेल तेवढा रवा घालणे. हे मिश्रण १० मिनिटे साठी भिजत ठेवणे.

2 Step

१० मिनिटानंतर पातळ केलेले तूप किंवा तेल छालून मिश्रण मिळवून घेणे आणी मिश्रण साधारण सरसरीत होईल इतपत त्यात उरलेले दुध घालणे.

3 Step

एकीकडे १० मिनिटांसाठी १८० तापमानाला अोवन प्रिहिट करणे.

4 Step

केक मोल्डला तूप पसरवून घेणे. तयार मिश्रणात फ्रूट साॅल्ट किंवा बेकिंग सोडा घालून फेटणे,त्यात लगेच टुटी फ्रूटी घालणे व हे मिश्रण केक मोल्ड मध्ये अोतून प्रिहीट केलेल्या अोवनला ४० - ४५ मिनिटांसाठी २०० तापमानावर ठेवणे.

5 Step

केळ टुटि फ्रूटी केक खायला तयार.

You May Also Like

Leave a Review