Add Recipe

खिचडी उत्तापा

  • तयारीची वेळ
    20 Mins
  • शिजण्याची वेळ
    55 Mins
  • किती लोकांसाठी
    4 People
  • बघितले
    969

साहित्य

१) रात्रीची उरलेली खिचडी
२) २-३ चमचे रवा आणि थोडंसं दही
३) ज्वारीचे पीठ
४) मुगाचे किंवा बेसन पीठ
५) बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर
६) जिरं पूड
७) हळद
८) लाल तिखट किंवा हिरवी मिर्ची ची पेस्ट
९) किंचित तेल
१०) मीठ चवीनुसार

कृती

1 Step

रात्रीची उरलेली खिचडी मिक्सर मधून वाटून घ्यावी. वाटलेले मिश्रण एका भांड्यात काढून त्यात २-३ चमचे रवा, ज्वारीचे पीठ, मुगाचे पीठ, थोडं दही घालावे व मिश्रण कालवून घ्यावे.

2 Step

मग त्यात, जिर पूड, हळद, लाल तिखट, मीठ, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालावे व पुन्हा उत्तपला लागतं तसे मिश्रण करून घ्यावे.

3 Step

एका नॉनस्टिक तव्यावर थोडेसे तेल घालावे व मिश्रण डोस्या सारखे घालावे. पण पळी ने पसरवू नये.

4 Step

दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्या. खिचडी उत्तपा वर लोणी घाला व त्याचा गरम गरम आस्वाद घ्या.

You May Also Like

Leave a Review